Wednesday, June 21, 2017

तणाव मुक्त जीवनासाठी योग करावा  
- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कदम
नांदेड दि. 21 :-  तणाव मुक्त जीवनासाठी योग अत्यंत उपयोगी असून प्रत्येक व्यक्तीने दररोज  किमान 30 मिनिटे योग करावा, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालया अंबिका योग कुटीर प्रशिक्षण केंद्रातील ज्ज्ञ  प्रशिक्षकामार्फत रुग्णालयातील धिकारी, कर्मचारी व परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षक संस्थेचे सचिव एस. टी. खरात, सहसचिव जे. एस. जाधव यांनी विविध प्रकारच्या आसनाच्या माध्यमातून योगाचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी  डॉ. दीपक हजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मिर्झापुरे, डॉ. वाघमारे, डॉ. शिरसिकर, डॉ. एच. के. साखरे यांची उपस्थिती होती

000000

No comments:

Post a Comment

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...