Thursday, December 13, 2018


महा-रेशीम अभियानाचा शुभारंभ
नांदेड, दि. 13 :-  सन 2019-20 मध्ये शासनमान्य समुहामध्ये मनरेगा योजनेंतर्गत नवीन तुती करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी “महा-रेशीम अभियान 2019” हे शनिवार 15 ते 29 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे  हस्ते महा-रेशीम अभियानाचा शुभारंभ व रेशीम रथाचे उद्घाटन सोमवार 17 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 10 वा. करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शेतकरी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...