Friday, October 26, 2018


ज्येष्ठ नागरीकांना विधी सेवा सहाय्य योजनेची
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात बैठक संपन्न
नांदेड दि. 26 :- ज्येष्ठ नागरीकांना विधी सेवा सहाय्य पुरविण्यासाठी योजना राबविण्याच्या अनुषंगाने समितीची बैठक जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश  डी. टी. वसावे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली.
यावेळी समिती सदस्य डॉ. हंसराज वैद्य, अॅड.  व्ही. डी. पाटनुरकर उपस्थितीत होते. बैठकीत जेष्ठ नागरीकांच्या समस्या जाणुन दाखल पूर्व प्रकरणांचा विचार करून आवश्यक विधी सेवा उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले. जेष्ठ नागरीकांचे न्यायालयीन प्रकरणे लवकर निकाली काढण्याबाबत संबधित न्यायालयात सुचना देण्यात आल्या. यावेळी जेष्ठ नागरीक लक्ष्मीबाई गणपत मेलपेदेवार यांना मोफत वकिल देण्यात आला.
            न्यायाधीश डी. टी. वसावे यांनी जेष्ठ नागरिकांनसन्मानाने, आनंदाने जीवन जगावे. तक्रार किंवा समस्या असेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मार्गदर्शन केले जाईल. मुलगा किंवा मुलगी कमवत असेल तर त्याच्या कमाई मधील काही रक्कम त्यांच्या आई-वडीलास खावटीपोटी देता येते असे ते म्हणाले. तसेच जेष्ठ नागरीकांचे हक्क, अधिकार कोणीही हिरावुन घेशकत नाही. आई-वडीलांकडे दुर्लक्ष करु नये. आई-वडील जीवंत असतांना त्यांच्या मुलभूत गरजा पुर्ण कराव्यात.    आपल्या मुलांकडुन छळ होत असल्यास मुलगा किंवा मुलकडुन पोटगी मिळवण्याचा हक्क त्याच्या आई-वडीलांना आहे. जेष्ठ नागरीकांनी स्वाभीमान जागृत करावा. आई-वडीलांची काळजी घ्यावी. तसेच समता, स्वातंत्र बंधुताची भावना आपल्या घरापासुन सुरू केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच जेष्ठ नागरीकांसाठी असलेल्या केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती यावेळी न्या. वसावे यांनी दिली.
000000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...