Friday, October 26, 2018


लोहा तालुक्‍यात 'एक दिवस नवमतदारासोबत' उपक्रम 27 रोजी
      नांदेड दि. 26 :- मतदारांना विशेष गृहभेटीव्‍दारे मतदार जनजागृती आणि मतदार नोंदणी मोहीम राबविण्‍यासाठी 'एक दिवस  नवमतदारासोबत' हा उपक्रम 27 आक्‍टोंबर 2018 रोजी लोहा तालुक्‍यात घेण्‍यात येत आहे. यासाठी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचेसह जवळपास अडीचशे कर्मचा-यांचा ताफा नियुक्‍त करण्‍यात आला असून ते गावोगावी जावून मतदारांना भेटी देणार आहेत तसेच नवमतदारांची मतदार म्‍हणून नोंदणी फॉर्म भरुन घेणार आहेत, अशी माहिती  लोहयाचे तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली.
       जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, उपजिल्‍हाधिकारी निवडणूक दिपाली मोतीयाळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली व कंधारचे उपविभागीय अधिकारी पी.एस बोरगावकर यांच्‍या नियोजनात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्‍या निर्देशानुसार 1 सप्‍टेंबर ते 31 आक्‍टोंबर 2018 या कालावधीत मतदार जनजागृती आणि मतदार नोंदणी मोहीम राबविण्‍यात येत आहे. याचाच एक भाग म्‍हणून 27 आक्‍टोंबर रोजी एक दिवस नवमतदारासोबत हा विशेष उपक्रम घेण्‍यात येत आहे. यासाठी विविध विभागाचे तपासणी अधिकारी, बिएलओ, पर्यवेक्षक, विविध विभागाचे सोबती कर्मचारी असे नियुक्‍ती आदेश जारी करण्‍यात आले आहेत. सदरील कामाची तपासणी करण्‍यासाठी कंधारचे उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर, तहसिलदार व्‍ही.एम. परळीकर हे व्‍यक्‍तीशः भेटी देणार आहेत.
       सदर रोजी बिएलओ आणि त्‍यांचे सोबती कर्मचारी त्‍यांना नेमूण दिलेल्‍या क्षेत्रातील सर्व कुंटूबाना भेटी देणार असून कुंटूबातील पात्र सदस्‍यांची नावे मतदार यादीत आहेत काय हे तपासून पाहणार आहेत. तसेच महिला मतदार, दिव्‍यांग व्‍यक्‍ती, नवमतदार यांची नोंदणी प्रमाण वाढविण्‍याकरीता विशेष प्रयत्‍न करणार आहेत.
       1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर 18 वर्ष पूर्ण होत असलेल्‍या पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्‍यासाठी नमुना नं (6), मतदार यादीतील नावे वगळण्‍यासाठी नमुना नं (7), दुरुस्‍तीसाठी नमुना नंबर (8) व विधानसभा मतदार संघाअंतर्गत स्‍थलांतरासाठी नमुना नंबर (8 अ) भरुन संबंधीत बिएलओ यांचेकडे दयावा. तसेच सर्व मतदारांनी त्‍यांची नावे मतदार यादीत असल्‍याबाबतची खात्री करावी.
       सर्व नियुक्‍त अधिकारी/कर्मचारी यांनी त्‍यांना नेमूण दिलेल्‍या क्षेत्रात जावून नवमतदारासाठी एक दिवस उपक्रम यशस्‍वी करावा तसेच मतदारांनी सदर उपक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी योगदान दयावे, असे आवाहन तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...