Friday, September 21, 2018


ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने
दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यातील ऑक्टोंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 26 सप्टेंबर 2018 रोजी मतदान व 27 सप्टेंबर 2018 रोजी मतमोजणी होत आहे. त्यासंबंधी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.
मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेली गावे याठिकाणी मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर सायं 6 वाजेपासून अनुज्ञप्ती बंद ठेवण्याची तारीख व ठिकाणी 25 सप्टेंबर 2018 रोजी व मतदानाचा दिवस 26 सप्टेंबर 2018 रोजी संपुर्ण दिवस. मतमोजणी होत असलेल्या शहर / गावात मतमोजणीचा दिवस 27 सप्टेंबर 2018 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे.
000000


No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...