Thursday, December 14, 2017

 केळी पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 14 :- केळी पिकांवर प्रादुर्भावग्रस्त वाळलेली पाने काढुन टाकावीत. पिवळया रंगाचे डाग पानावर दिसुन आल्यास त्वरीत कार्बेन्डॅझिम 50 डब्लु.पी 0.1 टक्के 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात 1 मिली स्टीकर टाकुन फवारणी करावी, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे  
उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड अंतर्गत मुदखेड व अर्धापूर या तालुक्यात केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत तीन किड सर्वेक्षक पिकावरील किड व रोगाचे सर्वेक्षण करीत आहे. मुदखेड तालुक्यात किड सर्वेक्षक म्हणुन बाबुराव मस्के, उमाकांत कापसे व अर्धापुर तालुक्यात अतिश गायकवाड तसेच किड नियंत्रक यु. के. माने हे काम करीत आहेत, असेही कृषि संदेशात नमुद केले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...