Thursday, December 14, 2017

रोजगार मेळाव्यात 147
उमेदवारांची प्राथमिक निवड  
नांदेड दि. 14 :- सुशिक्षीत बेरोजगार मेळाव्यात विविध कंपनीतील भरतीसाठी 147 उमेदवारांची प्राथमिक निवड नुकतीच करण्यात आली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा महत्मा फुले मंगल कार्यालय नांदेड येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी आरसेटीचे संचालक दिलीप शिरपूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक उल्हास सकवान होते.   
श्री. शिरपुरकर म्हणाले, सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी स्वत:तील कौशल्य ओळखून  त्याप्रमाणे स्वत:चा विकास करुन घेतला पाहिजे. श्री. सकवान यांनी बेरोजगारांनी विविध क्षेत्रातील संधीचा लाभ घेऊन स्पर्धेत टिकुन राहिले पाहिजे असे सांगितले.
यावेळी कंपनीचे अधिकारी यांनी भरावयाच्या पदासंबंधी तसेच कंपनी विषयी माहिती दिली. सेल्स ऑफिसर, हेल्प , सुरक्षा गार्ड, आयटीआय ट्रेनी , प्रोडक्शन ट्रेनी या पदाची भरती करण्यात आली आहे. सुत्रसंचलन श्रीमती सुप्रिया पाटील यांनी तर प्रास्ताविक उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुशिल उचले यांनी केले.
0000  

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...