Monday, November 20, 2017

रब्बी हंगामातील पिकांसाठी
विमा भरण्याचे आवाहन
नांदेड दि. 20 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात रब्बी हंगाम सन 2017-18 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जदार बिगरकर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2018 ही आहे. तसेच उन्हाळी भुईमुग पिकासाठी अंतिम तारीख 31 मार्च 2018 आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी बंधनकारक असुन बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5 टक्के ठेवण्यात आला आहे. जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पिक पेरणीपासुन काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, दुष्काळ, पावसातील खंड, किड रोग आदी बाबीमुळे पिकाच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान आदी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. नांदेड जिल्हयातील गहु (बा), ज्वारी (जि), हरभरा, करडई, सुर्यफुल, उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी ही योजना लागु आहे.
या योजनेंतर्गत विमा संरक्षीत रक्कम विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलेाली, धर्माबाद, नायगाव, मुखेड, कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, किनवट, माहूर तालुक्यातील गहु (बा) पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम हेक्टर  33 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता  495 रुपये राहील. नांदेड, अर्धापूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, मुखेड, देगलूर तालुक्यातील ज्वारी (जि) पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 24 हजार रुपये, पिक विमा हप्ता 360 रुपये आहे. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, देगलूर तालुक्यातील हरभरा पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 24 हजार  रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये 360 आहे. ही योजना नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि. मुंबई यांचेमार्फत राबविण्यात येणार आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 396

  जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन नांदेड दि.  30 :-  जिल्ह्यात आज ३० एप्रिल  व उद्या 1 मे 20...