Monday, November 20, 2017

"नांदेड ग्रंथोत्सव-2017" चे 22 ते 23 नोव्हेंबर रोजी
जिल्हा ग्रंथालय कार्यालय परिसरात आयोजन
ग्रंथ प्रदर्शन-विक्री, परिसंवाद, काव्य हास्य मैफिलीची मेजवानी
            नांदेड, दि. 20 :- ग्रंथालय संचालनालय मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या विद्यमाने "नांदेड ग्रंथोत्सव 2017" चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, गुरु गोविंदसिंजी स्टेडियम परिसर, डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाजवळ नांदेड येथे 22   23 नोव्हेंबर 2017 या दोन दिवसात ग्रंथप्रेमींना विविध कार्यक्रमांची मेजवाणी लाभणार आहे. बुधवार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. नांदेड ग्रंथोत्सव उद्घाटनास पालकमंत्री अर्जून खोतकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.   
            ग्रंथप्रसार, ग्रंथप्रदर्शन ग्रंथविक्री असा या ग्रंथोत्सवाचा द्दे असून प्रकाशक, ग्रंथविक्रिते आणि ग्रंथप्रेमी वाचकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. नांदेडसह महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या प्रकाशाची दालने याठिकाणी राहणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या औरंगाबाद येथील शासकीय ग्रंथगाराचे विशेष दालन या प्रदर्शनात राहणार असून या दालनात शासकीय प्रकाशने दुर्मिळ ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
 ग्रंथदिंडी द्घाटन समारंभ   
            बुधवार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वामहात्मा ज्योतिबा फुले पुतळा आयटीआय चौक येथून कार्यक्रम स्थळापर्यंत ग्रंथदिंडी आयोजित केली आहे. या दिंडीमध्ये विविध लोककला सादरीकरण  करणा-या सोबत लेझीम पथक, ढोलपथक, भजनीमंडळ यासह विद्यार्थी यांचा सहभाग असणार आहे. या ग्रंथदिंडीस प्रमुख उपस्थिती डॉ. अच्युत बन, एल. के. कुलकर्णी, डॉ. श्याम तेलंग, संजीव कुलकर्णी यांची राहणार आहे.
पालकमंत्री र्ज खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीसकाळी 11 वा. ग्रंथोत्सवाचे द्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते आणि डॉ. प्रभाकर देव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई निवृत्तीराव पवार (जवळगावकर), नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे महापौर सौ. शिलाताई किशोर भवरे, खा. अशोकराव चव्हाण, खा. राजीव सातव, खा. डॉ. सुनील गायकवाड, आमदार अमर राजूरकर, . सतीष चव्हाण, . विक्रम काळे,  . डी. पी. सावंत, . प्रदीप नाईक, . वसंतराव चव्हाण, . प्रताप पाटील चिखलीकर, . सुभाष साबणे, . हेमंत पाटील, . श्रीमती अमिता चव्हाण, . नागेश पाटील आष्टीकर, . तुषार राठोड, मनपा आयुक्त गणेश देशमुख, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, औरंगाबादचे सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड. गंगाधर पटने यांची उपस्थिती राहणार आहे.
दुपारी 2 वा. कवीसंमेलनाचे आयोजन लक्ष्मीकांत तांबोळी यांचे अध्यक्षतेखाली केले असून यात रविचंद्र हडसनकर, देविदास फुलारी, प्राचार्य गीता लाठकर, भगवान अंजनीकर, दत्ता डांगे, मनोज बोरगाकर, महेश मोरे, डॉ. मार्तंड कुलकर्णी, शिवाजी अंबुलगेकर, अशोककुमार दवणे, डॉ कमलाकर चव्हाण, दीपक सपकाळे, श्रीनिवास मस्के, अनिकेत कुलकर्णी, अशोक कुबडे, ज्योती मस्के, सुचिता खल्लाळ, बाळू दुकडुमवार, अमृत तेलंग, पूजा डकरे आदी कवी सहभागी असतील. सूत्रसंचालन बापू दासरी यांचे राहणार आहे. याच दिवशी सायं. 6.30 वा. ॲड. अनंत खेळकर यांचा "माझ्याजवळ बसा अन् खुदुखुदु हसा " हा तुफान विनोदी कार्यक्रम कुसुम सभागृहामध्ये आयोजित केला आहे.
ग्रंथोत्सवात दुसरे दिवशी गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी सकाळी  11 वा. कथाकथनाचा कार्यक्रम डॉ. जगदीश कदम यांचे अध्यक्षतेखाली होणार असून  यात डॉ. नागनाथ पाटील, दिगंबर कदम, प्रा.नारायण शिंदे, डॉ. शंकर विभुते यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी 2 वा. "माध्यम संस्कृती वाचन संस्कृती"   या विषयावरील परिसंवाद डॉ. नंदकुमार मुलमुले यांचे अध्यक्षतेखाली होणार असून यामध्ये राम शेवडीकर, संपादक उद्याचा मराठवाडा, डॉ. शैलजा वाडीकर, स्वा.रा.ती..वि.नांदेड, राजु गिरी, टी.व्ही.चॅनल 9 प्रतिनिधी, नीळकंठ पांचगे, अप्पर कोषागार अधिकारी, आनंद कल्याणकर, आकाशवाणी प्रतिनिधी, डॉ.गोविंद हंबर्डे, ग्रंथपाल, एम.जी.एम.महाविद्यालय,डॉ.हनुमंत भोपाळे, शंकरराव चव्हाण महा.अर्धापूर यांचा सहभाग राहणार आहे.
सायं 4 वासमारोप   बक्षिस वितरण समारोप डॉ. व्यंकटेश काब्दे यांचे अध्यक्षतेखाली प्र. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे हस्ते होणार असून. या कार्यक्रमास मनपाचे उपमहापौर विनय गिरडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, प्रा. उत्तमराव र्यवंशी, डॉ. सुरेश सावंत, डॉ. वृषाली किन्हाळकर, श्रीकांत देशमुख, डॉ. जगदीश कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे. ग्रंथोत्सव कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील सदस्य सचिव जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.

000000 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 396

  जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन नांदेड दि.  30 :-  जिल्ह्यात आज ३० एप्रिल  व उद्या 1 मे 20...