Monday, November 20, 2017

माजी सैनिकांच्या पाल्यासाठी
पंतप्रधान शिष्यवृत्ती अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ   
नांदेड दि. 20 :- माजी सैनिकाच्या पाल्यासाठी लागू असलेली पंतप्रधान शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची मुदत गुरुवार 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या माजी सैनिकांनी त्यांच्या पाल्यांचे  अर्ज  ऑनलाइन भरले नाहीत. त्यांनी गुरुवार 30 नोव्हेंबर 2017 पुर्वी अर्ज ऑनलाईन भरावेत.
  पंतप्रधान शिष्यवृत्ती ही माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी जे चालूवर्षामध्ये बारावी परिक्षेमध्ये 60 टक्के गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी व्यावसायिक कोर्सेससाठी जसे इंजीनिअरींग, एमबीबीएस, बीएएमएस, बीएस्सी नर्सींग, बीएस्सी फिजीओथेरीपी, बीएस्सी ॲग्री इत्यादी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे त्यांना लागू आहे.  यासंबधी पात्र माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर  सुभाष सासने यांनी  केले आहे. 

0000000

No comments:

Post a Comment