Sunday, January 25, 2026

 वृत्त क्र. 133 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे "हिंद दी चादर" शहीदी समागम कार्यक्रमासाठी नांदेड येथे आगमन 

नांदेड,दि. 25 (जिमाका) हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबई येथून विमानाने नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले.मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे आगमन होताच विमानतळ परिसरात त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन प्रसंगी पालकमंत्री श्री.अतुल सावे,खासदार अशोक चव्हाण,खासदार डॉ.भागवत कराड,खासदार डॉ.अजित गोपछडे, आमदार तुषार राठोड,राजेश पवार, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. 

मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पर्यावरण मंत्री श्रीमती. पंकजा मुंडे व आमदार रवींद्र चव्हाण यांचेही नांदेड येथे आगमन झाले.त्यानंतर मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस हे विमानतळावरून गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्तच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.

000000










No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...