Sunday, January 25, 2026

 वृत्त क्र. 132 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन 

नांदेड दि. 25 (जिमाका) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज नांदेड येथील गुरु गोविंद सिंघ जी विमानतळ येथे बारामती येथून विमानाने आगमन झाले.त्यांच्या आगमन प्रसंगी पालकमंत्री श्री.अतुल सावे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती. 

श्री.अजित पवार यांचे आगमन प्रसंगी पालकमंत्री श्री.अतुल सावे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,आमदार प्रताप पाटील चिखलीकर,विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व मनपा आयुक्त महेश डोईफोडे यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन त्याचे स्वागत केले. 

उपमुख्यमंत्री श्री.पवार हे विमानतळ येथून गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित " हिंद दी चादर " श्री.गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शासकीय वाहनाने रवाना झाले.

*****









No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...