Tuesday, January 13, 2026

वृत्त क्रमांक 45

नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील

मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   

नांदेड दि. 13 जानेवारी :- भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्ह्यातील नांदेड-वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मुख्यालयी मतमोजणी केंद्र परिसरात शुक्रवार 16 जानेवारी, 2026 रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतीरीक्त व्यक्तीस प्रवेशास प्रतिबंधित केले आहे.

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील नांदेड-वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने मतमोजणीच्या दिवशी शुक्रवार 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात नमूद केले आहे. 

000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...