Tuesday, January 13, 2026

वृत्त क्रमांक 42

जमिन मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी मोजणी

हद्दीच्या खुणा जागेवर दाखवून निश्चित करणे बंधनकारक   

नांदेड दि. 13 जानेवारी :- जमिन मोजणी प्रकरणांमध्ये अर्जदारांना वेळेवर आणि पारदर्शक सेवा मिळावी, यासाठी ही प्रक्रिया सुलभ व तात्काळ करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच तक्रारी कमी करणाच्या अनुषंगाने भूमि अभिलेख विभागामार्फत होणाऱ्या मोजणी कामांमध्ये पारदर्शकता, अचूकता आणि मोजणी कार्याची गुणवत्ता सुनिश्चित करून मोजणीसाठी उपस्थित असलेल्या भूकरमापक यांनी मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, त्याच दिवशी आणि त्याच वेळेस मोजणी केलेल्या गट / सर्वे नंबरच्या सर्व हद्दीच्या खुणा जागेवर निश्चित करून दाखवणे अनिवार्य आहे. हद्दीच्या खुणा निश्चित करताना किंवा खुणा दाखवताना मोजणी अर्जदार आणि लगत खातेदार उपस्थित असल्याची खात्री करावी. परंतू काही अपरिहार्य कारणास्तव/तांत्रिक कारणास्तव अडचण असल्यास जायमोक्यावर तसा पंचनामा नोंदवुन हददीखुणाची पुढील तारीख अर्जदार यांना त्याच दिवशी पंचासमक्ष, पंचनाम्यात नमूद करुन सर्व संबंधितांना सुचित करावे, असे परिपत्रक जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख श्रीमती सिमा देशमुख यांनी निर्गमीत केले आहे. 

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयामार्फत जमिन मोजणीनंतर अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही अर्जदाराला जमिनीच्या निश्चित केलेल्या हद्दी त्याच दिवशी जागेवर दाखवल्या जात नाहीत. तसेच मोजणी नकाशे वेळेत मिळत नसल्याने या विलंबामुळे अर्जदारांना अनावश्यक हेलपाटे मारावे लागतात आणि हद्द निश्चितीबाबत संभ्रम निर्माण होतो. तसेच काही वेळा हद्दी दाखवण्यापूर्वी वाद निर्माण होण्याची शक्यता असते. 

मोजणी पूर्ण झाली आहे, परंतु हद्दीच्या खुणा त्याच दिवशी निश्चित करून दाखवलेल्या नाहीत, अशा प्रकरणांची तक्रारी प्राप्त झाल्यास, संबंधित भूकरमापक यांना जबाबदार धरले जाईल आणि नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. परिपत्रकातील निर्देशांचे सर्व भूकरमापक यांनी काटेकोरपणे पालन करावे. सदर परिपत्रक दि. 1 जानेवारी 2026 रोजी पासुन लागु करण्यात आले आहे, असेही जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख श्रीमती सिमा देशमुख यांनी सांगितले आहे. 

तसेच मागिल वर्षात जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख नांदेड यांचे कार्यालयाचे अधिनस्त कार्यालयाने सर्व प्रकारची मोजणी प्रकरणे 4 हजार 674 निकाली करण्यात आली आहेत. प्राधान्याने भूसंपादन व शासकीय प्रकरणे निकाली करण्यात आली आहेत. अधिनस्त कार्यालयातील प्राप्त मोजणी प्रकरणात जलद गतीने कार्यवाही करुन 90 दिवसांत निकाली करण्याचे उद्दीष्टे ठेवण्यात आली आहे. तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात गावठाण भूमापनाचे काम सुरु असुन आतापर्यंत 871 गावांचे मिळकत पत्रिका तयार करण्यात आले आहेत व ते नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध आहेत.

00000

 

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...