Friday, February 16, 2024

 वृत्त क्र. 137 

मधकेंद्र योजनेअंतर्गत भंडारवाडी येथे जनजागृती मेळावा संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 16 :- मधकेंद्र योजने अंतर्गत किनवट तालुक्यातील मौजे. भंडारवाडी येथे 14 फेब्रुवारी रोजी एक दिवशीय जनजागृती मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास मधुमक्षिका पालन योजना, मधाचे गांव, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास सन्मान योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांची माहिती देण्यात आली.  

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिमान गादेवाड, महाबळेश्वर मध संचालनालयाचे संचालक व प्रमुख मार्गदर्शक डी. आर. पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. सारंगधर, मध निरीक्षक डि. व्हि. सुत्रावे व  ग्रामसेवक उमेश तुपकर तसेच उपसरपंच केंद्रे, सदस्य जेवलेवाड, भंडारवाडी येथील ग्रामस्थ महिला व पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.
 
या कार्यक्रमास मान्यवरांनी मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनेची माहिती दिल्याबाबत भंडारवाडीचे सरपंच अभिमान गादेवाड यांनी आभार मानले. भंडारवाडी हे गांव मराठवाडयातील एकमेव ‘मधाचे गाव’ म्हणून  जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मंडळाचे सभापती रविन्द्रजी साठे (राज्यमंत्री दर्जा),  मंडळाच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती विमला आर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना विकसीत करण्यात येत आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...