Monday, July 10, 2023

माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वित्तीय साक्षरता व जी-20 च्या भारतातील आयोजना संदर्भात प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न

 माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वित्तीय साक्षरता व जी-20 च्या

भारतातील आयोजना संदर्भात प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- भारतीय रिझर्व बँक व जिल्हा अग्रणी बँक नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद नांदेडद्वारा संचलित माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वित्तीय साक्षरता व जी-20 च्या भारतातील आयोजना संदर्भात प्रश्नमंजुषा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तामसा या शाळेच्या विद्यार्थिनी पूर्वा लाभशेटवार व समृद्धी ठमके यांचा प्रथम क्रमांक आला. तर द्वितीय क्रमांक देगलूर तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा शहापूर येथील आशिष ताटे यांचा तर तृतीय क्रमांक अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, पिंपळगाव महादेव येथील समीक्षा सरपटे व सुमित सदावर्ते यांचा आला.

 

विजेत्यांना विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक पक्काला कालिदासू यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रश्नमंजुषेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तामसा यांची राज्यस्तरीय परीक्षेसाठी निवड झाली आहे.  प्रथम क्रमांक आलेल्या पूर्वा लाभशेटवार व समृद्धी ठमके यांना राज्यातील शाळांसोबत परीक्षेसाठी 14 जुलै रोजी मुंबई येथे आमंत्रित करण्यात आले आहे.

 

तालुकास्तरीय परीक्षा नांदेड, नायगाव व हिमायतनगर येथे घेण्यात आल्या. या ठिकाणांवरील प्रथम तीन विजेते संघांची नांदेड येथे जुलै रोजी जिल्हास्तरीय परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा घेण्यासाठी रिझर्व बँकेचे व्यवस्थापक निखिल घुलाक्षेजिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके व त्यांचे सहकारी तसेच ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.  जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व उपशिक्षणाधिकारी बनसोडे यांचे विशेष सहाय्य केले.

0000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...