Monday, April 10, 2023

 फुले शाहू आंबेडकरी जलसा कार्यक्रमास आजपासून प्रारंभ 

§  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजन

§  शाहिर सीमा पाटील, नागसेन सवदेकर, डॉ. मधुकर मेश्राम फुले शाहू आंबेडकरी गीते व गझल सादर करतील

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी जलसा 2023 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ 11 एप्रिल 2023 पासून  होणार असून या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाचे आयोजन 11 ते 13 एप्रिल 2023 या कालावधीत करण्यात आले आहे. फुले शाहू आंबेडकरी जलसा 2023 या कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण, विधान परिषद सदस्य विक्रम काळे, विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार अशोक चव्हाण, आमदार भीमराव केराम, आमदार माधवराव पवार जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

या महोत्सवात मंगळवार 11 एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत तक्षशीला बुद्धविहार मैदानभगीरथ नगर, जंगमवाडी नांदेड येथे महात्मा फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर  शाहिर सीमा पाटीलनागसेन सवदेकरडॉ. मधुकर मेश्राम व सहकलाकार फुले शाहू आंबेडकरी  गीते व गझल सादर करतील. या जलसामध्ये प्रबोधनात्मक फुले शाहू आंबेडकरी  गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

 

बुधवार 12 एप्रिल 2023 रोजी सुप्रसिद्ध गायक मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवेचंद्रकांत प्रल्हाद शिंदेकुणाल वराळेगौरव जाधवहे आंबेडकरी जलसा सादर करतील. शाहिर  संतोष साळुंखे व सहकलाकार राजर्षी शाहू  महाराज यांच्यावर आधारित  जोशपूर्ण  शाहिरी पोवाडा सादर करतील.

 

गुरुवार 13 एप्रिल 2023 रोजी  सुप्रसिद्ध शाहीर मीरा उपममहाराष्ट्राचा महागायक अभिजीत कोसंबीप्रसेनजित कोसंबीसत्यजित कोसंबी व सहकलाकार  फुले शाहू आंबेडकरी गीतांच्या  गायनाने या जलसाची सांगता होणार आहे.

 

या फुले-शाहू-आंबेडकरी जलसामध्ये सहभागी कलाकारांचापुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या परिसंवादाचा तसेच  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलाकाराच्या कलापथकाचाशाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रमाचा नांदेडच्या कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावाअसे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य  बिभीषण चवरे यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...