Friday, November 11, 2022

 मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त

लोककल्याणकारी योजनांच्या जागृतीसाठी महामेळावा

 

13 नोव्हेंबर रोजी पीपल्स कॉलेजच्या प्रांगणात होणार जागर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

 

 नांदेड (जिमाका) दि.  11 :- समाजाच्या तळागाळातील गरजू पर्यंत विविध लोककल्याणकारी योजना पोहोचाव्यात व त्यांनाही विकासाच्या प्रवाहात येता यावे या उद्देशाने शासन विविध योजना आखते. यातील अनेक योजना भारतीय राज्यघटनेने दिलेल्या निर्देशानुसार साकारलेल्या आहेत. विविध विभागांच्या योजनाद्वारे आदिवासी भागातील बांधवांपासून महानगरांमध्ये राहणाऱ्या गरजू लाभधारकांना त्यांच्या हक्काच्या योजना मिळाव्यात, याबाबत साक्षरता व्हावी या उद्देशाने 13 नोव्हेंबर रोजी पीपल्स कॉलेजच्या प्रांगणात शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या उपक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले. या बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. डी. एम. जज, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतियाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशावरुन 31 ऑक्टोंबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संपूर्ण नांदेड जिल्हामध्ये कायदेशीर जागरूकता आणि प्रसाराद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण मोहीम राबविण्याबाबत येत आहे. त्याअनुषंगाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश व्ही. न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम व्यापक करण्यात आला आहे. समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना योग्य तो न्याय मिळण्याच्या उद्देशाने त्यांना देण्यात येणाऱ्या मोफत विधी सेवा, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाची माहिती होईल व त्या योजनांचा लाभ त्यांना मिळण्यासाठी तसेच समाजातील अगदी तळागाळातील व्यक्ती सुध्दा या योजनेपासुन वंचित राहू नये यासाठी त्यांच्यात जागृती होण्यासाठी नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमीत्त जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 13 नोव्हेंबर 2022 रोजी पीपल्स कॉलेज मैदान, स्नेहनगर नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आयोजीत केले आहे.


या महाशिबीरामध्ये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या तर्फे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचावी व त्यांचा लाभ त्यांना मिळावा, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय योजनेचा महामेळावा आयोजीत केला आहे. या महामेळाव्यात तहसिल कार्यालय नांदेड अंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या सेवा व योजना, नवीन रेशन कार्ड योजना, रेशनकार्ड मधील नावात दुरुस्ती करणे, रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, नवीन आधार नोंदणी / दुरुस्ती, आधार कार्ड मध्ये नावात बदल, आधार कार्ड मध्ये जन्म तारखेत बदल, आधारकार्ड मधील पत्ता बदल, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर, वय,अधिवास व राष्ट्रीयत्व  प्रमाणपत्र, जातीचा दाखला, मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री श्रम-योगी मानधन योजना, आम आदमी विमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय  विधवा निवृत्ती वेतन योजना, आयुष्यमान भारत योजना, ई-श्रम , बांधकाम कामगारासाठी विविध योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, 33 टक्के महिला आरक्षण योजना आदी कल्याणकारी योजनाचे स्टॉल शासनाच्या विविध विभागामार्फत लावण्यात येणार आहेत. नांदेड जिल्हातील सर्व नागरीाकांनी या महामेळाव्यास उपस्थीत राहुन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदेड 
 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती डी. एम. जज यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...