Friday, November 11, 2022

 ग्रंथोत्सवानिमित्त 20 नोव्हेंबर रोजी

विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 

प्रवेशिका 17 नोव्हेंबर पर्यंत सादर कराव्यात  

 

 नांदेड (जिमाका) दि.  11 :- उच्च व तंत्रशिक्षण विभाग जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 व 20 नोव्हेंबर 2022 या दोन दिवशीय ग्रंथोत्सवानिमित्त माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार 20 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2 ते 4 यावेळेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह शेजारी श्री गुरू गोंविदसिंघजी स्टेडियम परीसर नांदेड येथे होणार आहे. आजची समाज माध्यमे व वाचन संस्कृती हा स्पर्धेचा विषय देण्यात आला आहे.

 

नाव नोंदणीसाठी स्पर्धकांनी कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह शेजारी श्री गुरू गोंविदसिंघजी स्टेडियम परीसर नांदेड  या पत्यावर किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9421868639  किंवा dlonandeddol@maharashtra.gov.in येथे संपर्क साधावा. स्पर्धकाला भाषणासाठी सहा मिनीटे वेळ देण्यात येईल. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मराठीमध्ये भाषण करावे लागेल. माध्यमिक विद्यालयातील कोणत्याही दोन स्पर्धकांना प्रवेश दिला जाईल. नाव नोंदणीसाठी माध्यमिक विद्यालयांनी मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीच्या पत्रासह नाव शाळा वर्ग इत्यादीसह दोन विद्यार्थ्यांची स्पर्धक म्हणून प्रवेशिका व नाव नोंदणी शुक्रवार 17 नोंव्हेबर पर्यंत लेखी नोंदणी करावी. यानंतर आलेल्या प्रवेशिका स्विकारण्यात येणार नाही. स्पर्धकांने प्रवेशाच्या वेळी ओळखपत्र सोबत ठेवावे. तसेच स्पर्धकास कोणत्याही प्रवेश फी किंवा कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता देता येणार नाही याची  नोंद घ्यावी. मान्यवर परीक्षकांनी दिलेल्या भाषणातील सरासरी गुणांवरून पारितोषिक दिले जाईल. प्रथम क्रमांक पारितोषिक 1000 रूपये, व्दितीय क्रमांक पारितोषिक 500 रूपये, तृतीय क्रमांक पारितोषिक 300 रूपये ग्रंथ, प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ 200 रूपये प्रमाणपत्र पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभाग नोंदवा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...