Thursday, November 24, 2022

 

मन्याड नदीवरील पुलाचे काम सुरु असल्याने पर्यायी

मार्गाचा वापर करण्याबाबत 27 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 24 :- कंधार तालुक्यातील बहादरपूरा गावापासून फुलवळ या गावास जाणाऱ्या रस्त्यावरील मन्याड नदीवरील पुलाचे/रस्त्याचे काम सुरु आहे. या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध केला आहे. त्याऐवजी बहादरपुरा-घोडज-शेकापुर-बिजेवाडी फाटा-फुलवळ मार्गे मुखेडकडे ये-जा करण्यासाठी या पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत यापूर्वी अधिसूचना निर्गमीत केली होती.


पुलावरील कामाच्या क्युरिंगसाठी 8 दिवसाचा कालावधी लागणार आहे. नवीन विअरिंग पिरेडसाठी कोटवरुन वाहतूक सोडणे अपेक्षित नसल्याबाबत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हादंडाधिकारी यांना विनंती केली. या विनंतीनुसार या मार्गावरील वाहतूक बहादरपुरा-घोडज-शेकापुर-बिजेवाडी फाटा-फुलवळ मार्गे मुखेड कडे ये-जा करेल. या पर्यायी मार्गाचा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी रविवार 27 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.   

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...