Monday, October 3, 2022

 नैसर्गिक शेतीविषयी पुणे येथे

 राज्यस्तरीय कार्यशाळा

 

§  राज्यातील सुमारे 2 हजार शेतकरी कार्यशाळेस उपस्थित राहणार

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- कृषी विभागामार्फत गुरुवार 6 ऑक्टोबर 2022 रोजी बालेवाडी, क्रिडा संकुलपुणे येथे नैसर्गिक शेती विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तारफलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीला देशात प्रोत्साहन देणेरासायनिक खतांच्या मुख्यतः युरीयाचा वापर कमी करणे यावर भर देण्याचे निर्देश दिलेले आहेत. यादृष्टीने गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कुरुक्षेत्र हरियाणा येथे केलेले नैसर्गिक शेतीचे प्रयोग आदर्श आहेत. त्यांनी कुरुक्षेत्र येथील गुरुकुलाची सुमारे २०० एकर शेती पुर्णत: नैसर्गिक शेतीमध्ये परीवर्तीत केली आहे. या  शाश्वत शेतीच्या प्रयोगाबद्दल त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

 

राज्यभरातून सुमारे २ हजार शेतकरी या कार्यशाळेस उपस्थित राहतील. कार्यशाळेला जोडून नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषि विभागाच्या युट्युब चॅनलवर  https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयशासकीय कार्यालयेकृषि विज्ञान केंद्र. कृषि संशोधन संस्था इ. ठिकाणी करण्यात येत आहे.

00000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...