Monday, January 24, 2022

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील

मुख्य रोडवर प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 24 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे मान्यवरांचे हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोमवार 25 जानेवारी 2022 रोजी (24 जानेवारीच्या मध्यरात्री पासून) ते मंगळवार 26 जानेवारी 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...