Monday, January 24, 2022

नांदेड जिल्ह्यात 484 व्यक्ती कोरोना बाधित

तर 554 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 547 अहवालापैकी 484 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 445 तर अँटिजेन तपासणीद्वारे 39 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 98 हजार 969 एवढी झाली असून यातील 92 हजार 62 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 258 रुग्ण उपचार घेत असून यात 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे लोहा तालुक्यातील धानोरा येथील 46 वर्षाच्या पुरुषाचा रविवार 23 जानेवारी रोजी मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 659 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 279, धर्माबाद 3, लोहा 25, हिमायतनगर 2, परभणी 22, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 40, कंधार 3, मुदखेड 9, अर्धापूर 14, आदिलाबाद 1, यवतमाळ 1, भोकर 5, हदगाव 4, मुखेड 15, बिलोली 1, बीड 1, औरंगाबाद 3, देगलूर 5, किनवट 3, उमरी 2, नायगाव 3, उमरखेड 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 22, बिलोली 2, हदगाव 3, मुखेड 12 असे एकुण 484 कोरोना बाधित आढळले आहे.

 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 469, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 75, खाजगी रुग्णालय 3, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 554 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 33, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 982, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 205, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 30 एकुण 4 हजार 258  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 33 हजार 605

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 19 हजार 655

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 98 हजार 979

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 92 हजार 62

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 659

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.90 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-60

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 258

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-5. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...