Thursday, November 12, 2020

 

शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यावर बंदी 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यावर जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये बंदी घातली आहे. 

शासकीय कर्तव्‍य पार पाडणाऱ्या व्‍यक्‍ती, दंडाधिकारी शक्‍ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी- कर्मचारी, बँकेच्‍या सुरक्षाव्‍यवस्‍थेवरील अधिकारी व महाराष्‍ट्र शासन गृह विभागाचे दिनांक 20 सप्‍टेंबर 2014 च्‍या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यातील छाननी समितीने वगळलेल्‍या शस्‍त्र परवानाधारका व्‍यतिरीक्‍त इतर सर्व परवानाधारक व्‍यक्‍तींना परवाना दिलेली शस्‍त्रास्‍त्रे वाहुन नेण्‍यावर बंदी घातली आहे. हा आदेश नांदेड जिल्‍ह्यासाठी 11 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहील.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...