Thursday, November 12, 2020

 पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 12 :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 च्या निवडणूक विषयक कामकाजाच्याि अनुषंगाने सर्व मतदान केंद्राध्यीक्ष, मतदान अधिकारी व झोनल अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण डॉ. शंकरराव चव्हा ण प्रेक्षागृह नांदेड येथे आज घेण्याधत आले. जिल्हायधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर जिल्हा्धिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाआ निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांनी हे प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणासाठी उपजिल्हांधिकारी (पुनर्वसन) श्रीमती दिपाली मोतीयाळे, उपजिल्हारधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) डॉ. सचिन खल्ला ळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व तहसिलदार किरण आंबेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
मतदान केंद्रावरील कामाचे प्रशिक्षणासोबत जिल्हाी ग्रंथालय येथील 6 विविध कक्षामध्ये लोखंडी मतपेटी उघडणे, मतदानासाठी तयार करणे व मतदानानंतर सील करणे इत्यायदी बाबतचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यावत आले. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाच्यास दिवशी पार पाडावयाच्या् विविध कामांची प्रात्या क्षिक घेण्यातसाठी डमी मतदान केंद्र तयार करुन प्रशिक्षण देण्याात आले.
या प्रशिक्षणासाठी मतदान केंद्राध्याक्ष 144, मतदान अधिकारी 437 आणि झोनल अधिकारी यांना दोन सत्रात हे प्रशिक्षण देण्याित आले. त्यासाठी प्रेक्षागृहात सुरक्षित अंतर राखुन 50 टक्के बैठक क्षमतेचा वापर करण्या्त आला. अनुपस्थित असलेल्याे 9 मतदान केंद्राध्यृक्ष व 25 मतदान अधिकारी यांना लोकप्रतिनिधीत्वक अधिनियमाखाली कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याा. अनुपस्थित असलेल्याि संबंधिताचे खुलासे असमाधानकारक असल्यावस नियमानुसार कार्यवाही प्रस्ताावित करण्यातचे निर्देश जिल्हारधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
या प्रशिक्षणापूर्वी प्रशिक्षण केंद्राला पूर्णतः र्निजंतुकीकरण करण्याकत आले. या प्रशिक्षणादरम्यामन कोविड 19 च्या् अनुषंगाने अँटीजेन टेस्ट, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर व मास्कचे वाटप इत्याादी सुविधा प्रशिक्षणादरम्याकन उपलब्धा करुन देण्या्त आल्या होत्या.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...