Thursday, March 5, 2020

कर्करोग तपासणी शिबिराचे शनिवारी नांदेड येथे आयोजन
नांदेड दि. 5 :- कर्करोग रुग्णांसाठी श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे शनिवार 7 मार्च 2020 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत सर्व प्रकारच्या कर्करोग रुग्णांसाठी कर्करोग रुग्ण तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यांतर्गत सर्व प्रकारच्या कर्करोग रुग्णांसाठी ‘जिल्हा कर्करोग नियंत्रण कार्यक्रम’ सन 2018-19 व 2019-20 या कालावधीत राबविण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आढळून आलेल्या सर्व प्रकारच्या संशयीत कर्करोग रुग्णांसाठी शनिवार 7 मार्च 2020 रोजी श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत सर्व प्रकारच्या कर्करोग रुग्णांसाठी युनिवर्सल हेल्थ चेक-अप कॅम्प (कर्करोग रुग्ण तपासणी शिबीर) घेण्यात येणार आहे. या शिबिरास हैद्राबाद व नांदेड येथील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत कर्करोग रुग्णांची तपासणी, आवश्यक तो उपचार करण्यात येणार आहे.
जिल्ह्यांतर्गत सर्व प्रकारच्या संशयित कर्करोग स्त्री-पुरुष रुग्णांनी या कर्करोग तपासणी व उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...