Sunday, March 29, 2020


कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

नांदेड, दि. 29 :- कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेड येथील दोघांनी आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे  1 लाख 44 हजार 877 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
ओमकार कंट्रक्शनचे दादाराव ढगे यांनी 1 लाख 11 हजार रुपये तर रामदास होटकर यांनी आपल्या पेन्शन मधून 33 हजार 877 रुपये देणगीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिला. त्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सुपूर्द केला.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, पुरवठा अधिकारी शरद मंडलिक आदींची उपस्थिती होती.
कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री  सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे.
त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. 
*सढळ हाताने मदत करा*
उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. 
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...