Wednesday, January 22, 2020


केवळ आधार संलग्न कर्ज खात्यांना मिळणार
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ
कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न करुन घेण्याचे आवाहन
नांदेड, दि. 22 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.
नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीस अंदाजे 2 लाख 20 हजार 145 शेतकरी पात्र असून त्यापैकी 1 लाख 95 हजार 122 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक संलग्न आहेत. उर्वरित 25 हजार 23 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक संलग्न नाहीत त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी तत्काळ संपर्क करुन आपले कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न करुन घ्यावेत त्याशिवाय शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही. 
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय या ठिकाणी "मदत कक्ष" स्थापन करणेबाबत आदेश दिले आहेत. तसेच बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नाहीत अशा शेतकऱ्यांच्या याद्या गावात प्रसिद्ध कराव्यात व गावस्तरावर याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी करुन संबंधित खातेदारानी दोन दिवसात बँकेत जाऊन बँक खाते आधार क्रमांक संलग्न करुन घेण्याचे,  आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...