Wednesday, January 22, 2020


संमतीने जमीन वाटप (पोट हिस्सा) करणे आता झाले सोपे
नांदेड, दि. 22  :- सात/बारा वरील सर्व धारकांची संमती असल्यास भुमि अभिलेख विभाग सर्व धारकांनी संमती दिल्याप्रमाणे नकाशा तयार करुन देणार आहे.
जामाबंदी आयुक्त आणि संचालक भुमि अभिलेख पुणे यांच्या परिपत्रकानुसार सर्व संमतीने पोट हिस्सा नकाशा स्वतंत्र 7/12 करता येणार आहे. या पुर्वी पोट हिस्सा करण्यासाठी अर्जदाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर जागेवर जावुन मोजणी करुन पोट हिस्सा नकाशा तयार केला जात असे. आता मात्र सर्व सहधारकानी संमतीने पोटहिस्सा अर्ज केल्यास मुळ अभिलेखाची खात्री करुन सर्व सहधारकांची संमतीने दाखल केलेल्या नकाशा 7/12 वरील क्षेत्राप्रमाणे कार्यालयात पोट हिस्सा नकाशा तयार करता येणार आहे.
त्या कामी अर्जदार यांना पुढील प्रमाणे कागदपत्रे देणे आवश्यक आहे. पोटहिस्सा मोजणी करण्यासाठी सर्व सहधारकाची स्वाक्षरी असलेला असलेला अर्ज मोजणीव्दारे ऑनलाईन भरुन घेतला जाणार.या अर्जावर साधी मोजणी फी आकारणी केली जाईल. एखाद्या सहधारकाची स्वाक्षरी / संमती नसल्यास पोटहिस्सा करता येणार नाही. गट नंबर /  सर्व्हे नंबरचे सर्व 7/12 (तिन महाचे आतील.) धारण जमिनी मध्ये कसे पोटविभाग करवयाचे आहेत, ते दर्शविणारा सर्व सहधारकांच्या  स्वाक्षरी असलेला कच्चा नकाशा, तसेच  7/12 वेगळा झाला असल्यास गाव नमुना 6   मधील कच्चा नकाशा. या नकाशा प्रमाणे प्रत्येक भोगवटादार यांच्या कब्जे वहिवाटीत असलेले अंदजित क्षेत्र अधिकार अभिलेखत असलेल्या क्षेत्राचा तपशील, तसेच सामायिक क्षेत्रात विहीर, बोअरवेल, वस्ती झाडे यांचा तपशील देणे आवश्यक आहे. भोगवटादार यांनी ओळख पटवण्यासाठि फोटो ओळखपत्राची स्वसांक्षांकित छायाप्रत देणे आवश्यक आहे सदरचे ओळख पत्र हे सरकारने दिलेले अधिकृत फोटो ओळख पत्र असणे आवश्यक आहे.
याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यास  उपअधिक्षक भुमि अभिलेख यांच्या कडुन सर्व सहधारकांना  नोटिस दिली जाईल. कच्चा नकाशा आणि क्षेत्राचा तपशील सर्व सहधारक यांना मान्य असल्यास जबाब उप अधिक्षक भुमि अभिलेख यांच्या समोर इन कॅमेरा नोंदवला जाईल. जबाब घेताना अधिकारी आणि सर्व सहधारकांचा एकत्रीत फोटो मोबाईल किंवा अन्य कॅमे-याव्दारे घेतला जाऊन, त्याची नोंद ठेवण्यात येणार आहे. एखाद्या प्रकरणात चौकशीची गरज भासल्यास अर्ज प्राप्त झाल्यानंतर एक महिन्यात प्रक्रिया पुर्ण केली जाईल. चौकशीची गरज नसल्यास सात दिवसात कार्यवाही होईल. संमतने पोटहिश्याची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर तो लागु झाल्यानंतर संबधीत धारकास आवश्यक वाटल्यास  त्यांचे पोटहिस्साची हद्द कायम करण्या साठी कार्यालयाकडे स्वतंत्र मोजणी अर्ज करता येईल.
सात/बारा प्रमाणे स्वतंत्र नकाशा करुन घेणे साठी सहधारकांनी संमतीने पोटहिस्सा साठी आपल्या तालुक्यातील उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयास संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख नांदेड यांनी केले आहे.      
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   404   लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये  मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड दि. 3 मे :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2...