Wednesday, December 11, 2019


सर्वसाधारण, स्थानिक, डोंगरी विकास योजना
संगणकीय प्रणालीचे आज नांदेड येथे प्रशिक्षण
नांदेड, दि. 11 :- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), खासदार व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम तसेच डोंगरी विकास कार्यक्रम योजनांच्या प्रभावी सनियंत्रणासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याबाबत प्रशिक्षणाचे आयोजन गुरुवार 12 डिसेंबर 2019 रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन कॅबिनेट हॉल येथे सकाळी 11 वा.  करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमास औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त नियोजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते होणार आहे. या  कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची उपस्थिती राहणार आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), खासदार व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम तसेच डोंगरी विकास कार्यक्रम योजनांच्या प्रभावी सनियंत्रणासाठी iPAS-Integrated Planning Office Automation System ही संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...