Wednesday, December 11, 2019


स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिका चाचणी परीक्षे
अर्ज करण्यास 27 डिसेंबरची मुदतवाढ
नांदेड, दि. 11 :- सेतु समिती नांदेड संचलित स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिकेत युपीएससी व एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी सेतू समिती संचलित स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिकेत प्रवेश घेण्यास इच्‍छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्यास 27 डिसेंबरची मुदतवाढ देण्यात आली आहे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव सेतू समिती नांदेड यांनी केले आहे.  
उमेदवारांनी 13 ते 27 डिसेंबर 2019 कालावधीत www.nanded.gov.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन अर्ज करावीत. यापुर्वी ज्‍या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केली आहेत त्‍यांनी पुन:श्‍च अर्ज करु नये. परंतु ज्‍यांनी परीक्षा शुल्क जमा केली नाही त्‍यांनी शुल्क जमा करणे आवश्‍यक आहे. त्‍यानंतर त्‍यांचा परिक्षेसाठी प्रवेश निश्चित केला जाईल. या निवड चाचणी परिक्षेस मुदतवाढ देण्यात आली असून 5 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12 यावेळेत ही परिक्षा घेण्‍यात येणार आहे. परिक्षेसाठी उमेदवाराकडे कोणत्‍याही शाखेची पदवी असणे आवश्‍यक आहे. परिक्षा शुल्‍क दोनशे रुपये असून 13 ते 27 डिसेंबर 2019 पर्यंत सकाळी 10 ते सायं 5 या कालावधीत ग्रंथपाल स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिका स्‍टेडीयम परिसर नांदेड यांच्याकडे भरणा करावी.
परिक्षेचे स्‍थळ नांदेड जिल्‍ह्याच्‍या www.nanded.gov.in या संकेतस्‍थळावर वेगळ्याने प्रसिध्‍द करुन आपणास प्रवेशपत्र ऑनलाईन काढण्‍याची सुविधा 31 डिसेंबर 2019 ते 4 जानेवारी 2020 रोजी उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल व परिक्षेचा निकाल 5 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वा. वरील संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात येईल, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव सेतू समिती नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...