Friday, November 22, 2019


संविधान साक्षर ग्राम उपक्रमाचे आयोजन
टाकळी, बोंढार (नेरली) या दोन गावांची निवड  
नांदेड दि. 22 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांचे समतादूत प्रकल्पाच्यावतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात संविधान साक्षर ग्राम उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात देगलूर तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत व नांदेड तालुक्यातील बोंढार (नेरली) ग्रामपंचायत या गावांची निवड करण्यात आली आहे.  
या गावात संविधान जनजागृती, स्वच्छता उपक्रम, बचतगट भेटी, महिला साक्षरता, वाचन साहित्य व संविधान प्रत यांचे वाटप इत्यादी स्वरुपात हा उपक्रम आहे. 26 नोव्हेंबर रोजी बोंढार (नेरली) येथे संविधान साक्षर ग्राम उपक्रमाचे उद्घाटन, रॅलीचे आयोजन व भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन मान्यवरांच्या उपस्थित होणार असून या राष्ट्रीय उपक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रकल्प अधिकारी समतादूत प्रकल्प बार्टी पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
संविधान साक्षर ग्राममध्ये विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यात 26 नोव्हेंबर रोजी संविधान साक्षर ग्राम उद्घाटन कार्यक्रम, उद्देशिका वाचन, प्रभात फेरी, अभिवादन. 27 नोव्हेंबर रोजी स्वच्छता अभियान, काव्यात्मक संविधान वाचन (प्रतीदिन वाचन करणे), 28 नोव्हेंबर सांडपाणी व्यवस्था मार्गदर्शन, 29 नोव्हेंबर बार्टी संस्थेची माहिती चालवले जाणारे विविध उपक्रमाची माहिती (ग्रामस्थ/लहान मुले), 30 नोव्हेंबर कृषी योजनाची माहिती, 1 डिसेंबर ग्रामस्थांना संविधान उद्देशिकेचा अर्थ समजावून सांगणे, 2 डिसेंबर गावातील स्मशानभूमी येथे वृक्षारोपण व स्वच्छता, 3 डिसेंबर बचतगटसंदर्भात माहिती, 4 डिसेंबर आरोग्य शिबिर, 5 डिसेंबर समाज कल्याण योजनाची माहिती, 6 डिसेंबर संविधानावर पथनाट्य, 7 डिसेंबर रोजी विधवा, परीतत्या, विकलांग महिलांसाठी असणाऱ्या योजनाची माहिती. 8 डिसेंबर ग्रामस्थाशी संवाद, 9 डिसेंबर महिला सक्षमीकरण (गावातील महिलांना मार्गदर्शन), 10 डिसेंबर विद्यार्थी चित्रकला स्पर्धा वयोगट 10-15 विषय माझे गाव, 11 डिसेंबर संविधान आधारित एक दिवसीय चर्चासत्र, कार्यशाळा, 12 डिसेंबर बाल विवाह प्रतिबंध कायदा, बाल मजूर कायदा, 13 डिसेंबर व्यसनमुक्ती कार्यक्रम, 14 व 15 डिसेंबर ग्रामस्थाशी संवाद,  16 डिसेंबर रक्तदान शिबिर, डोळे तपासणी शिबीर, 17 डिसेंबर निबंध स्पर्धा वयोगट 16 ते 20 विषय संविधान, 18 डिसेंबर युवक/युवती मेळावा शैक्षणिक व रोजगार संधी, 19 डिसेंबर मानवतेची शिकवण यावर प्रबोधन कार्यक्रम. 20 डिसेंबर अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम (ग्रामस्थ/लहान मुले), 21 डिसेंबर माहिती अधिकार अधिनियम 2005 माहिती देणे, 22 डिसेंबर ग्रामस्थाशी संवाद, 23 डिसेंबर संविधानातील मुलभूत अधिकार व कर्तव्य माहिती देणे, 24 डिसेंबर स्वच्छता अभियान, (संपूर्ण गाव पुन्हा ग्रामस्थाच्या मदतीने स्वच्छ करणे), 25 डिसेंबर रोजी समारोप कार्यक्रम, बक्षिस वितरण (शासकीय अधिकारी यांचे उपस्थिती) अशी माहिती बार्टीच्यावतीने देण्यात आली आहे.
0000



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...