Friday, November 22, 2019


शासन मान्यताप्राप्त व्यवसाय
अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 22 :- शासनाची मान्यता नसताना काही संस्थांनी व्यवसाय अभ्यासक्रमाचे अवैध प्रवेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना अनेक अडचणींना समोर जावे लागले. अशा प्रकारची पुनरावृत्ती होवू नये म्हणून विद्यार्थी व पालकांनी अकरावी व बारावी व्यवसाय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यापूर्वी त्या संस्थेस महाविद्यालयास शासनाची मान्यता आहे किंवा नाही याची खात्री करुन प्रवेश घेण्यात यावा.
जिल्ह्यात क्रॉप सायन्स, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, हॉर्टीकल्चर, फ्रेश वॉटर फिश कल्चर, ॲनमल सायन्स ॲड डेअरी, ऑफीस मॅनेजमेंट, बँकिंग असे विविध व्यवसाय अभ्यासक्रम मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयामध्ये चालविले जाते.
शासनमान्य संस्थेची, महाविद्यालयाची माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, उज्जवल गॅस एजन्सी समोर, आनंदनगर रोड नांदेड दूरध्वनी क्रमांक 02462-253366 येथे उपलब्ध होईल याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जी. जी. पाटनुरकर यांनी केले आहे.
000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...