Friday, October 4, 2019


औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ, औरंगाबाद विभाग औरंगाबादसाठी
मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम घोषीत
नांदेड,‍दि. 4 :- मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 31 जुलै 2019 च्‍या प्रसिद्धीपत्रकान्‍वये दिनांक 01 नोव्‍हेंबर, 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ, औरंगाबाद विभाग औरंगाबाद साठी मतदार याद्या नव्‍याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम घोषित केला आहे. घोषीत केलेला कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
















त्‍यानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर संघाचे मतदार यादीत नाव नोंदणी करण्‍यासाठी हक्‍कदार असलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीस मतदार नोंदणी नियम 1960 मधील नमुना 18 मध्‍ये अर्ज दिनांक 06 नोव्‍हेंबर, 2019 पुर्वी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व मंडळ अधिकारी यांचे कार्यालयात नाव समाविष्‍ट करण्‍यासाठी पाठवावा किंवा पोहचावावा. नमुना 18 मधील कोरे अर्ज हे संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व मंडळ अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्‍ध असतील. 
पदवीधर मतदार संघाची मतदार यादी प्रत्‍येक निवडणुकीपुर्वी नव्‍याने तयार करणे आवश्‍यक असल्‍यामुळे या मतदारसंघातील सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या मतदार यादीत ज्‍या व्‍यक्‍तींची नावे समाविष्‍ट आहेत अशा सर्व व्‍यक्‍तींनीदेखील विहित नमुन्‍यात नव्‍याने अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...