Friday, October 4, 2019


86- नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघात
मतदार जनजागृतीसाठी सेल्‍फी पॅाईंट
नांदेड दि. 4 :- 86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणूकीत मतदान जनजागृती व मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी सेल्‍फी पॉईंट लावण्‍यात आला. या सेल्‍फी पॉईंटचे उद्घाटन  अप्‍पर जिल्‍हाधिकारी  खुशालसिंह परदेशी यांचे हस्‍ते करण्‍यात आले. या अभियानात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्‍येने सहभाग नोंदवून सेल्‍फी काढल्‍या. सर्व सहभागींनी मतदान करणारच असल्‍याचा संकल्‍प बोलून दाखवला. 
या कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी 86 उत्‍तर विधानसभा तथा उपजिल्‍हाधिकारी रोहयो  सदाशिव पडदूणे, तहसिलदार सं.गां.यो, जिल्‍हाधिकारी कार्यालय श्रीमती वैशाली पाटील, तहसिलदार तथा सहायक जिल्‍हा पुरवठा अधिकारी  मिटकरी आर डब्‍ल्यू, तहसीलदार सामान्‍य, जिल्‍हाधिकारी कार्यालय प्रसाद कुलकर्णी, नायब तहसिलदार रोहयो सुनिल माचेवाड हे उपस्थित होते. सेल्‍फी पॉईंट आयोजनासाठी स्विप कक्षप्रमुख श्री आडे यांचेसह गणेश रायेवार, प्रसाद शिरपूरकर, श्रीमती कविता जोशी, श्रीमती अनघा जोशी, श्री वाकोडे यांनी नियोजन केले.
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...