Tuesday, September 3, 2019

मंत्रिमंडळ बैठक : दि. 3 सप्टेंबर २०१९


नियोजन विभाग
नांदेड गुरुद्वारास दिलेली रक्कम अनुदानात रुपांतरित
            राज्य शासनाकडून नांदेड गुरुद्वारा बोर्डास गुरु-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यासाठी बिनव्याजी स्वरुपात देण्यात आलेली ६१ कोटी रुपयांची रक्कम अनुदानामध्ये रुपांतरित करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
            श्री गुरु गोविंदसिंगजी महाराज यांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथास ३०० वर्षे पूर्ण झाल्यान‍िम‍ित्ताने नांदेड शहरात २००८ मध्ये गुरु-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गुरुद्वारा बोर्ड, गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब, नांदेड यांना बिनव्याजी स्वरुपात ६१ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली होती. ही रक्कम अनुदानात रुपांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
-----०-----

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...