Friday, August 2, 2019

महसूल दिन उत्साहात संपन्न



नांदेड, दि. 2 :- येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्यावतीने महसूल दिन 1 ऑगस्‍ट रोजी कै. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह येथे उत्साहात साजरा करण्‍यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे होते तर उद्घाटक म्‍हणून मनपा आयुक्त लहुराज माळी व प्रमुख पाहुणे म्‍हणून उपवनसंरक्षक आशिष ठाकरे तसेच व अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहा.जिल्‍हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभिनव गोयल यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्‍हयातील पाणी टंचाईची परिस्‍थती, जलयुक्‍त शिवार अभियान, पी एम किसान योजना, तसेच  होट्टल महोत्सव, कर्करोग जनजागृती, योग दिवस, असे अनेक उल्‍लेखनिय कामाचा उलगडा मनोगतामध्‍ये केला.
मनपा आयुक्त लहुराज माळी, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी  खुशालसिंह परदेशी व सर्व संघटनेचे पदाधिकारी यात प्रामुख्‍याने किरण अंबेकर, लक्ष्‍मण नरमवाड, कुणाल जगताप, प्रफुल खंडागळे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.
            या कार्यक्रमात महसूल विभागामार्फत सन 2018-19 या वर्षात केलेल्‍या उल्‍लेखनिय कामाचे सविस्‍तर प्रास्‍ताविक निवासी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी  यांनी केले तर सुत्रसंचलन तहसिलदार श्रीमती वैशाली पाटील व नायब तहसिलदार श्रीमती स्‍नेहलता स्‍वामी यांनी केले.
           
यावेळी जिल्‍ह्यातील एकूण 53 उत्‍कृष्‍ट अधिकारी / कर्मचारी यांना प्रशस्‍तीपत्र देऊन त्‍यांचा गौरव करण्‍यात आला. तसेच एकूण 37 सेवा निवृत्‍त अधिकारी / कर्मचारी यांचे सपत्‍नीक शाल व श्रीफळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला. महसूल विभागातील दहावी व बारावीमध्‍ये 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेतलेल्‍या अधिकारी / कर्मचारी यांच्‍या एकूण 20 गुणवंत पाल्‍यांना सन्‍मान चिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. 16-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत स्‍थापित दिव्‍यांग मतदान केंद्रावर स्‍वयंप्रेरणेने सहभाग घेतले एकूण 04, दिव्‍यांग कर्मचारी यांचा प्रशस्‍तीपत्र देऊन गौरव करण्‍यात आला.
पाचव्या अंतरराष्‍ट्रीय योन दिनानिमित्त 21 जून 2019 रोजी नांदेड येथे राज्‍यस्‍तरीय योग शिबिराचे यशस्‍वीरित्‍या कार्यक्रमांचे आयोजन केल्‍याबाबत श्री माळी आयुक्‍त, मनपा, श्री परदेशी अपर जिल्‍हाधिकारी, नांदेड, श्रीमती ढालकरी निवासी उपजिल्‍हाधिकारी नांदेड व सर्व टिम प्रमुख उपजिल्‍हाधिकारी व इतर अधिकारी यांनी योग दिनाचा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी  केलेल्‍या कामकाजाबाबत त्‍यांचाही  प्रशस्‍तीपत्र देवून गौरव करण्‍यात आला.
अ.का. गिरीष येवते यांनी मनाली ते लेह खार्दुंकला हे जगातील दुस-या कमांकाचे उंच ठिकाण असून या ठिकाणी त्‍यांनी 550 कि.मी. सायकलींग प्रवास 10 दिवसात पुर्ण केल्याबाबत प्रशस्‍तीपत्र देऊन गौरविण्‍यात आले.
यावेळी नांदेड जिल्‍ह्यामधून विविध संवर्गातून उत्कृष्‍ट काम करणाऱ्या भोकरचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक, अर्धापूरचे तहसिलदार सुजीत नरहरे, संजय सोलंकर, ना.त. मुदखेड, संतोष शहाणे लघुलेखक (नि.श्रे.), शे.रफीक शे.शे.गुलाब वाहनचालक तहसिल कार्यालय उमरी तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयातून फैय्याज अहेमद खान पि.युसूफ खान अव्‍वल कारकून, माधव पवार लिपीक, गजानन काळे शिपाई यांना प्रशस्‍तीपत्र देवून गौरविण्‍यात आले. सर्व उपविभागातून  प्रत्‍येकी एका उत्‍कृष्‍ट अ.का., मं.अ., लिपीक, तलाठी, शिपाई, कोतवाल यांना प्रशस्‍तीपत्र देवून गौरविण्‍यात आले.
       या कार्यक्रमास जिल्‍ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व महसूल संघटणेचे पदाधिकारी व अधिकारी/कर्मचारी हे बहुसंख्‍येने उपस्थित होते. शेवटी मुगाजी काकडे, नायब तहसिलदार यांनी सर्व मान्‍यवरांचे, उपस्थितांचे आभार मानले.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...