Friday, August 2, 2019

कर्जमाफी तक्रार निवारण समितीची स्थापना शेतकऱ्यांना समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन



नांदेड, दि. 2 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेतंर्गत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर तक्रार निवारण समितीकडे अर्ज करुन आपले म्हणणे सादर करावे, असे आवाहन नांदेडचे सहकारी संस्था  जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेतंर्गत काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याबाबतच्या तक्रारी शासनाकडे व सहकार विभागाच्या विविध कार्यालयाकडे प्राप्त होत आहे. तसेच या योजनेच्या लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने कर्जपुरवठा केला जात नाही अशा तक्रारी प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शासनाने 12 जुलै 2019 च्या शासन निर्णयान्वये तालुकास्तरीय समिती गठीत केली आहे.
या आदेशानसार जिल्ह्यातील सर्व उप / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तालूका कार्यालयात उपनिबंधक / सहायक निबंधक यांच्या उपस्थितीत आठवड्यातील सोमवार व गुरुवारी असे दोन दिवस सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत समितीची सभा होईल. या सभेत बँकेच्या अधिकाऱ्यासमवेत चर्चा करुन शेतकऱ्याच्या प्रश्न सोडविण्याच्या सूचना आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे नांदेडचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...