Friday, August 9, 2019


प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजनेत
जिल्ह्यातील 1 लाख 36 हजार 129 शेतकऱ्यांना पहिला तर  
1 लाख 21 हजार 496 शेतकऱ्यांना दुसरा हप्ता बँक खात्यात जमा
        नांदेड दि. 9 :-प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी ( PM-KISAN)  योजनेअंतर्गत निश्‍चीत उत्‍पन्‍न मिळण्‍याकरीता भूधारक शेतकऱ्यांना प्रती शेतकरी कुटूंबाला प्रति वर्ष 6 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य तीन टप्‍प्‍यामध्‍ये केंद्र शासनाकडून थेट शेतकरी कुटूंबाच्‍या बॅंक खात्‍यामध्‍ये जमा येत असून, नांदेड जिल्‍हयातील 1 लाख 36 हजार 129 इतक्‍या शेतकऱ्यांना पहिला हप्‍ता व 1 लाख 21 हजार 496 इतक्या शेतकऱ्यांना दुसरा हप्‍ता शेतकरी कुटूंबाच्‍या बॅंक खात्‍यामध्‍ये जमा करण्‍यात आला आहे.
            नांदेड जिल्‍हयातील अर्धापूर - 6362, भोकर - 6889, बिलोली - 7792, देलगूर – 10674, धर्माबाद – 5898, हदगांव – 15926, हिमायतनगर – 10753, कंधार – 12873, किनवट-14310, लोहा-7352, माहूर – 6330, मुदखेड – 5578, मुखेड – 11200, नायगांव – 7842, नांदेड – 104 व उमरी  -6606 इतक्‍या लाभार्थी कुटूंबाना पहिला हप्‍ता जमा करण्‍यात आला आहे. तसेच नांदेड जिल्‍हयातील अर्धापूर - 5825, भोकर - 6025, बिलोली - 6825, देलगूर – 9090, धर्माबाद – 5860, हदगांव – 14219, हिमायतनगर – 7851, कंधार – 12361, किनवट-12649, लोहा-6991, माहूर – 6248, मुदखेड – 5258, मुखेड – 8909, नायगांव – 6917, नांदेड – 83 व उमरी  -6385 इतक्‍या लाभार्थी कुटूंबांना दुसरा हप्‍ता जमा झालेला आहे.
        शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग यांचे परिपत्रक दि.04.02.2019 अन्‍वये शेतक-यांना निश्‍चीत उत्‍पन्‍न मिळण्‍याकरीता प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी ( PM-KISAN)  योजना  सुरू करण्‍यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत संविधानीक पदावरील व्‍यक्‍ती, विद्यमान व माजी मंत्री/ संसद-विधानभवन सदस्‍य/ महापौर/नगराध्‍यक्ष/ जिल्‍हा पंचायत सभापती तसेच कार्यरत व सेवानिवृत्‍त कर्मचारी (वर्ग-4 वगळून व रु.10,000 पेक्षा कमी निवृत्‍तीवेतन असलेले निवृत्‍तीवेतनधारक वगळून) व डॉक्‍टर/ अभियंता/ वकील/ चार्टर्ड अकाउन्‍टन्‍ट / आर्कीटेक्‍ट, इ. यांचेसह मागील वर्षात आयकर भरणारे व्‍यक्‍ती या सर्वांना वगळण्‍याचे आले आहे. जिल्‍हाधिकारी श्री. अरूण  डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्‍हयातील 3,04,925 इतकया पात्र लाभार्थी कुटूंबांची माहिती माहे फेब्रुवारी 2019 या महिन्‍यात पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्‍यात आलेली आहे. तसेच कृषी मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.07.06.2019  अन्‍वये प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत क्षेत्र मर्यादेची अट शिथिल (अल्‍प, अत्‍यल्‍प व बहूभूधारक) सरसकट सर्व भूधारक शेतक-यांना लागू करण्‍यात आली आहे. त्‍यानुषंगाने नवीन पात्र असलेले 86,813 लाभार्थी कुटूंबांची माहे जुन 2019 मध्‍ये पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्‍यात आली असून, जिल्‍हयात एकूण 3,91,738 पात्र लाभार्थी शेतकरी कुटूंबाची माहिती अपलोड करण्‍याचे काम पुर्ण करण्‍यात आले असून, वंचित राहिलेल्‍या पात्र लाभार्थी कुटूंबाचा शोध घेऊन तालुकास्‍तरावर अपलोड करण्‍याचे काम सुरू  आहे, अशी माहिती येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...