Wednesday, July 24, 2019

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमातील सुधारनेबाबत ग्रंथालयाचे आवाहन



नांदेड, दि. 24 :- महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांत कालानुरुप सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जनतेकडून अभिप्राय  व सुचना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे  31 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावीत असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले चार नियम 1) महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहायक अनुदान आणि इमारत साधनसामग्री अनुदाने यासाठी मान्यता) नियम 1970. 2) महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय संघ (सहायक अनुदानासाठी मान्यता देणे) नियम 1971.  3) महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये, राज्य ग्रंथालय परिषद जिल्हा ग्रंथालय समित्या (कामकाजाची कार्यपध्दती ) नियम, 1973 . 4) महाराष्ट्र ग्रंथालयांना (संशोधन साहित्यिक परिसंस्थाची ग्रंथालये) सहायक अनुदानाकरिता मान्यता देण्याचे नियम, 1974  यामध्ये कालानुरुप सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
यासदंर्भात याद्वारे ग्रंथालय चळवळीशी संबंधित लेखक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक, मुद्रक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवक, वाचक सभासद, शैक्षणिक ग्रंथपाल, ग्रंथालय व्यावसायिक, संस्था, लोकप्रतिनिधी, महिला, महाविद्यालय / विदयापिठीय ग्रंथालय माहितीशास्त्राचे प्राध्यापक, संचालनालयातील अधिकारी कर्मचारी वर्ग संबंधित सर्वांना जाहिर आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी प्रस्तावित अधिनियम नियमांत सुधारणा/ बदल सुचवितांना त्यांचे बाबनिहाय सकारण योग्य समर्थन करणे आवश्यक आहे. तसेच सुधारणा/अभिप्राय/मत/ सुचना इ. विषयक पत्रव्यवहार समक्ष /टपाल /ईमेलद्वारे ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हयाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांना दि. 31ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावा. याबाबतचा संपुर्ण तपशील ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिला आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय डीजीटल उपकेंद्र नांदेड बहुउद्देशिय सांस्कृतिक संकुल, श्री गुरु गोबिंदसिंगजी स्टेडीयम परिसर, नांदेड 431602दुरध्वनी  02462-236228 ईमेल dlonanded.dol@maharashtra.gov.in येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...