Wednesday, July 24, 2019

विभागीय स्तरावरील लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे 13 ऑगस्टला आयोजन



औरंगाबाद,दि. 24:- विभागीयस्तरावरील लोकशाही दिन विभागीय महिला लोकशाही दिन महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ठेवण्यात येतो. परंतु 12 ऑगस्ट रोजी 'बकरी ईद' च्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी असल्याने त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस मंगळवार, दि.13 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11.00 वा. या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  
तक्रार करण्यासाठीचे अर्ज 15 दिवस अगोदर दिनांक 29 जुलै   2019 पर्यंत विहित नमुना प्रप्रत्र-1() मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसिलदार) यांच्याकडे  स्विकारण्यात येणार आहे.विहित नमुना अर्जही  प्रप्रत्र-1() आवक शाखेत  उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच  विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला बाल विकास, खोकडपुरा औरंगाबाद तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावे.
अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे पुन्हा सादर कराव्यात. विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणाऱ्या नागरिकांनाच 13 ऑगस्ट 2019 सकाळी 11.00 वा. समक्ष अर्ज सादर करण्याची परवानगी राहील. तसेच ज्यांनी यापुर्वीच्याविभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील परंतू त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता येणार नाही. असे विभागीय आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.
******

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...