Friday, January 11, 2019


व्यवसायकर विशेष नोंदणी अभियान
नांदेड दि. 11 :- महाराष्ट्र व्यवसायकर कायदा 1975 अन्वये नाव नोंदणीकृत व नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, मालकांना व्यवसाय कर नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी व्यवसाय कर विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून विशेष नोंदणी अभियान 14 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2019 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
व्यवसायकर कायद्यांतर्गत नाव नोंदणीकृत व नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तींनी, मालकांनी व्यवसाय कराची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमानुसार व्यवसाय कर अधिकारी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी अथवा परिसराला भेट देणार आहेत. अनोंदीत असल्यास जागेवर नोंदणी करुन घेतली जाणार आहे. तसेच नोंदणीसाठी बाजारपेठ, मॉल, व्यवसाय केंद्रे, औद्योगिक वसाहत या ठिकाणी नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहेत.
त्याबाबतचे ठिकाण तारीख www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबरोबरच वस्तू व सेवाकर कार्यालय, रेल्वे स्टेशन जवळ नांदेड येथे मदत कक्ष उपलब्ध करण्यात येणार आहे. अनोंदीत नाव नोंदणी, नोंदणी करदात्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवसाय कर विभाग नांदेड राज्यकर सहआयुक्त एस. जी. शेख व व्यवसाय कर अधिकारी डॉ. अविनाश चव्हाण यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...