Friday, January 11, 2019


मुख्यमंत्र्यांचा सोमवारी शेतकऱ्यांशी लोकसंवाद
मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार
नांदेड, दि. 11 : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 जानेवारीला लोकसंवाद साधून जाणून घेतली. या लोकसंवादाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यानंतर सोमवार दि. 14 जानेवारीला सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री आणि लाभार्थी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकसंवाद होणार आहे. हा थेट लाईव्ह संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे.
            हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या www.twitter.com/Dev_Fadnavis  या ट्विटर हॅण्डलवर तसेच www.facebook.com/devendra.fadnavis या फेसबुक पेजवर आणि  www.youtube.com/DevendraFadnavis या युट्यूब चॅनलसह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे ट्विटर www.twitter.com/MahaDGIPR www.facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेजसह www.youtube.com/maharashtradgipr या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. त्याशिवाय http://elearning.parthinfotech.in/या लिंकवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी, फळबागा, कांदा चाळ, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, अन्न प्रक्रिया, शेडनेट, पॉली हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांबाबत सातत्याने आढावा घेतला आहे.
००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...