Monday, December 17, 2018


नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ

निवडणूक 2018 साठी निवडणूक विषयक पहिले प्रशिक्षण संपन्‍न

नांदेड, दि. 17:- जिल्‍हाधिकारी, नांदेड यांची अधिसूचना दि. 26 नोव्‍हेंबर 2018 अन्‍वये नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍य निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे. सदरील निवडणूकीसाठी दिनांक 14 डिसेंबर 2018 रोजी श्री गुरु ग्रंथ साहिब भवन, नांदेड येथे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्‍न झाले.

या प्रशिक्षणामध्‍ये नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातुर, उस्‍मानाबाद, परभणी, हिंगोली व चंद्रपुर जिल्‍ह्यातील अपर जिल्‍हाधिकारी, अतिरीक्‍त पोलीस अधिक्षक, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रिय अधिकारी,  मतदान केंद्राध्‍यक्ष, मतदान अधिकारी हे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेबाबतचे सविस्‍तर प्रास्‍ताविक जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. तसेच निवडणूकीदरम्‍यान कायदा सुव्‍यवस्‍थेची परिस्थिती हाताळण्‍याबाबतचे मार्गदर्शन पोलीस अधिक्षक संजय जाधव  यांनी उपस्थितांना केले. मतदान प्रक्रियेबाबत आणि मतमोजणी करण्‍याबाबतचे प्रशिक्षण उपजिल्‍हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी दिले.

सदरील निवडणूकीचे दुसरे प्रशिक्षण व निवडणूक साहित्‍य वाटप दि.25 डिसेंबर, 2018 रोजी श्री गुरु ग्रंथ साहिब भवन, नांदेड येथे होणार असल्‍याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्‍यावी. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्‍या वतीने कळविले आहे.

 

****

No comments:

Post a Comment