Monday, December 17, 2018


नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणूक 2018

प्रशिक्षणास गैरहजर असलेल्‍या अधिकारी / कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस

नांदेड,दि. 17:- जिल्‍हाधिकारी, नांदेड यांची अधिसूचना दिनांक-26 नोव्‍हेंबर 2018 अन्‍वये नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍य निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे. सदरील निवडणूकीसाठी दिनांक 14 डिसेंबर 2018 रोजी श्री गुरु ग्रंथ साहिब भवन, नांदेड येथे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्‍न झाले. सदरील प्रशिक्षणामध्‍ये नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातुर, उस्‍मानाबाद, परभणी, हिंगोली व चंद्रपुर जिल्‍ह्यातील सर्व अपर जिल्‍हाधिकारी, सर्व अतिरीक्‍त पोलीस अधिक्षक, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, सर्व क्षेत्रिय अधिकारी,  मतदान केंद्राध्‍यक्ष, मतदान अधिकारी हे उपस्थित होते.

या प्रशिक्षणास गैरहजर असणाऱ्या मतदान केंद्राध्‍यक्ष, क्षेत्रिय अधिकारी तसेच इतर अधिकारी / कर्मचारी यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, संबंधित जिल्‍हाधिकारी यांचेमार्फत त्‍यांना खुलासा सादर करण्‍यास कळविले आहे. गैरहजेरीचा खुलासा सादर करणा-यांविरुध्‍द शिस्‍तभंग विषयक कार्यवाही प्रस्‍तावित करण्‍यात येईल. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्‍यावी. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्‍या वतीने कळविले आहे.

****

No comments:

Post a Comment