Friday, October 19, 2018


सा. बां. खात्याच्या रस्त्यावरील
खड्डयांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
नांदेड, दि. 19 :- सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत असलेल्या रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 233 1383  सुरु करण्यात आला आहे.
मा. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश व शासनाच्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी सुरु केला आहे. निर्देशान्वये मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद या कार्यालयात तक्रारींची दखल घेण्यासाठी ग्रीव्हन्स रिड्रेस यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी प्रादेशिक कार्यालयात केंद्र निर्माण करुन कार्यान्वित करण्यात आले आहे. याद्वारे कार्यालयात लेखी तक्रारी स्विकारण्यात येत आहेत. 1800 233 1383 या टोल फ्री क्रमांकाद्वारे  सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी मुख्य अभियंता कार्यालयात स्वीकारण्यात येत आहेत. तसेच www.mahapwd.com या वेबसाईटवर Citizen मेनुमध्ये सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सुविधा दिव्यांग व्यक्तींना वापराण्यायोग्य आहेत.  
मुख्य अभियंता कार्यालयाकडून उपरोक्त सुविधेद्वारे रस्त्यावरील खड्डयांच्या प्राप्त झालेल्या तक्रारी कार्यवाहीसाठी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येणार आहेत. या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...