Sunday, October 14, 2018


ग्रामस्थांनी विविध योजनेतून
गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड,दि. 14 :- ग्रामस्थांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत मुख्यमंत्री दत्तक ग्राम कनकवाडी येथे महाराजस्व अभियानातंर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसीलदार नरेंद्र देशमुख, सरपंच श्रीमती जयश्री व्यवहारे, उपसरपंच श्रीमती सुमनबाई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या हस्ते दत्तक ग्राम फलकाचे अनावरण, पांदण रस्त्याचे भूमिपूजन, शाळेतील मिनी अरो फिल्टर व विविध स्टॉलचे उद्घाटन, आमदार निधीतील सभागृहाचे भूमिपूजन, विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त निबंध व चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, राशन कार्ड, शेतकरी मासिक, मृद आरोग्य पत्रिका, हरभरा बियाणे, सामुदायिक शेतळे पूर्वसंमतीपत्र, निराधारांना मानधन वाटप, अंडी वाटप, महिला बचत गटाला प्रमाणपत्र आणि अनुसूचित जमातीच्या 120 लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कृषी, पशुवैद्यकीय, आरोग्य व शिक्षण विभागांचा स्टॉल लावण्यात आला होता. तसेच पशुसंवर्धन विभागातर्फे पशुचिकित्सा शिबिरात 120 जनावरांची तपासणी करण्यात आली.  
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकास्तर व ग्रामपंचायत स्तरावरील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी, गावकरी यांनी संयोजन केले.
 प्रास्ताविक मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक पांडुरंग मामीडवार यांनी तर सुत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य पंडित व्यवहारे यांनी आभार मानले.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...