Tuesday, October 9, 2018


दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या
परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 9 :- दिपावली उत्सव 2018 मध्ये तात्पुरती फटाका विक्रीची दुकाने सुरु करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. तालुका भोकर व मुदखेड ग्रामीण हद्दीत तात्‍पुरते फटाका परवाना विस्फोटक अधिनियम 2008  नुसार अर्ज 4 ते 19 ऑक्टोंबर 2018 पर्यंत महा-ई-सेवा केंद्र सेतू भोकर व मुदखेड यांचे मार्फत विक्री व स्विकारले जातील, असे उपविभागीय दंडाधिकारी भोकर यांनी कळविले आहे.     
तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात पुढील कागदपत्रांसह अर्ज कार्यालयात दाखल करावेत.   नमुना AE-5 मधील अर्ज, परवाना घेण्‍याच्‍या दुकानाचा नकाशा ज्‍यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण, साठवणूक क्षमता, त्‍याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्‍यादी तपशील दर्शविण्‍यात यावा. The Explosive Rules 2008 मधील नियम 86(3) अन्‍वये सदर व इतर दुकान यात किमान 15 मीटरचे अंतर असणे आवश्‍यक  आहे. नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र. परवाना शुल्कासाठी 500 रुपये चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिकरित्‍या दुकाने टाकण्‍यात येत असल्‍यास संबंधीत अर्जदारास देण्‍यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter). संबंधीत ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद यांचे  नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्‍टेशनचे चारित्र्य व नाहरकत प्रमाणपत्र. जागेच्‍या मालकी हक्‍काचा पुरावा. दुकानाच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था तपशील अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक इ.. इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार.
अर्जदाराने विहित नमुन्‍यातील अर्ज व सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर नोंदवून देण्‍यात येईल. चलनाद्वारे शुल्क शासन जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, अर्ज महाईसेवा केंद्र भोकर व मुदखेड यांचेकडे 4 ते 19 ऑक्टोंबर पर्यंत स्विकारण्यात येतील. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याच कालावधीत परवाने महाईसेवा केंद्रामार्फत वितरीत करण्यात येतील.
       सण उत्सव कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञाप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिणामापर्यतचाच व्‍यवहार करता येईल. याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करुन ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरुपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही उपविभागीय दंडाधिकारी भोकर यांनी कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...