Tuesday, October 9, 2018


जवरला येथे सर्व रोगनिदान महाआरोग्य शिबिराचे शनिवारी आयोजन
ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
नांदेड, दि. 9 :- राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दत्तक घेतले गाव किनवट तालुक्यातील जवरला येथे शनिवार 13 ऑक्टोंबर 2018 रोजी सर्व रोगनिदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ जवरला व लगतच्या गावातील ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.    
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, आरोग्य विभाग व मानव विकास कार्यक्रमांतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत करण्यात येणार आहे. यात गरोदर व स्तनदा मातांची तपासणी, बालकांची तपासणी (मानव विकास कार्यक्रम). नेत्ररोग विषयक तपासण्या व सल्ला. सिकलसेल तपासणी. असांसर्गिक आजारांबाबत (रक्तदाब, मधूमेह, कर्करोग) (एन.सी.डी. कार्यक्रम). प्रयोगशाळा तपासणी. आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड वाटप. इतर आजार तपासणी (जनरल फिजीशियन). आरोग्य प्रदर्शनी व जनजागृती. याप्रमाणे सर्व विभागाचे सहकार्य व समन्वयाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे महाआरोग्य शिबीर जवरला येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टांराकडून संबंधीत रुग्णांची व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार आहे. जवरला येथील ग्रामस्थ तसेच लगतच्या गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात या सर्व रोगनिदान महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असेही आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...