Tuesday, September 25, 2018


मुग, उडीद, सोयाबीनची आधारभूत दराने खरेदी;  
शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 25 :- राज्यात खरीप हंगाम 2018-19 मध्ये विविध जिल्ह्यात नाफेड या संस्थेच्यावतीने मुग, उडीद व सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मालाची खरेदी केंद्रे शासनाच्या आधारभूत दराने करण्यात येणार आहे. सर्व खरेदी नलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या तालुक्यात त्यांची जमीन आहे त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
मुग, उडीद व सोयाबीनचे आधारभूत दर खालील प्रमाणे आहेत :-
तपशिल
आधारभूत दर हंगाम 2018-19
नोंदणी कालावधी
मुग
6975/-
25/09/2018 ते 09/10/2018
उडीद
5600/-
25/09/2018 ते 09/10/2018
सोयाबीन
3399/-
01/10/2018 ते 31/10/2018

नोंदणीचा प्रारंभिक कालावधी 15 दिवसांचा असेल. तसेच अपवादात्मक प्रकरणी त्यांनतर आलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची नोंदणी खरेदी सुरु झाल्याच्या पहिल्या 15 दिवसांत करण्यात येईल. त्यानंतर नोंदणी होणार नाही. नोंदणीकरिता आधारकार्डची प्रत व मुग/उडीद/सोयाबीन या पिकानोंद असलेला 7/12 उतारा सादर करावयाचा आहे. शेतकऱ्याचा कार्यरत असलेला मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर द्यावयाचा आहे.  नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. शेतकऱ्यांनी ज्या केंद्रावर नोंदणी केलेली आहे. त्याच केंद्रावर माल आणावयाचा आहे. एसएमएस शिवाय आणलेला माल परत पाठविण्यात येईल. शेतकऱ्यांनी एफएक्यु दर्जाचा माल म्हणजेच काडीकचरा नसलेला, चाळणी करुन व सुकवून 12 % पेक्षा जास्त आर्द्रता नसलेला माल आणावा. तसा माल नसल्यास परत पाठविण्यात येईल.
खरेदी संस्था माल आणल्यानंतर खालील बाबी तपासून त्याची होत असेल तरच खरेदी बाबत निर्णय घेईल:- शेतकरी नोंदणीकृत आहे किंवा कसे, एसएमएस दिल्यानंतर माल आणला किंवा कसे, शासनाने निश्चित केलेल्या उत्पादकतेनुसार व खरेदीच्या मर्यादेनुसार माल आणला किंवा कसे, 7/12 च्या पिकपेऱ्याची नोंद, खरेदी करावयाच्या पिकाची नोंद आहे किंवा कसे, गुणवत्ता नियंत्रकाच्या मते माल एफएक्यु दर्जाचा आहे किंवा कसे, इलेक्ट्रनिक वजनकाट्यावर मोजणी झाल्यानंतर मालाची नोंद वजनासह करुन काटापट्टी शेतकऱ्यांना देण्यात येईल. खरेदी केलेल्या मालाची एनईएमएल पोर्टलवर त्याच दिवशी नोंद करण्याचे बंधन सबएजन्ट / खरेदी संस्थेवर राहील. शेतकऱ्यांना शेतमालाची रक्कम त्यांच्या आधार कार्डाशी संलग्न बँक खात्याद्वारेच देण्यात येईल. त्यामुळे आपले बॅक खाते आधार कार्डशी संलग्न  असल्याची त्यांनी खात्री करावी.पोर्टलवर नोंदविलेल्या पिकाखालील क्षेत्राची 7/12 व स्थळ पाहणी करुन महसुल व कृषि विभागाकडून पडताळणी करण्यात  येईल. या योजनेचा लाभ सर्व शेतकरी बांधवानी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...